February 15, 2025 7:58 PM February 15, 2025 7:58 PM

views 4

४४व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ

४४व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर जवळ वाळूज इथल्या दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात उभारलेल्या विलासराव देशमुख साहित्य नगरीतून निघालेल्या ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ झाला. मसिआचे अधक्ष चेतन राऊत यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आलं. या ग्रंथदिंडीत लेझीम पथक, लाठी काठी पथक, भजनी मंडळ सहभागी झालं होतं. लाठी काठी फिरवण्याचं प्रात्यक्षिक तसंच भारूड आणि देशभक्तीपर गीतं सादर करून य...