November 16, 2025 4:38 PM

views 30

४४ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात दाखवण्यात आला देशातल्या डिजिटल परिसंस्थेच्या परिवर्तनाचा प्रवास

नवी दिल्लीत आयोजित ४४ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात डिजिटल इंडिया मंडपामधे देशातल्या डिजिटल परिसंस्थेच्या परिवर्तनाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. यात डिजिलॉकर, उमंग, माय स्कीम, नीक्सी, नील्ट सर्ट इन, भारत सेमिकंडक्टर मिशन आणि आधार यांचा समावेश आहे. डिजिटल इंडिया उपक्रमाद्वारे डिजिटल सक्षमीकरण, पारदर्शकता आणि समावेशकतेला देशात कशाप्रकारे प्रोत्साहन दिलं जात आहे, हे या प्रदर्शनातून दाखवल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटलं आहे.

November 14, 2025 1:15 PM

views 36

४४व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याला आजपासून प्रारंभ

नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून ४४ वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा सुरू होत आहे. यंदाचा हा व्यापार मेळा,  ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार ही राज्यं या आंतरराष्ट्रीय मेळ्यात सहभागी झाली असून यामध्ये झारखंड हे राज्य केंद्रस्थानी असणार आहे. युएई, चीन, इराण, दक्षिण कोरिया आणि इजिप्तसह १२ देशांचा,  या १४ दिवस चालणाऱ्या व्यापार मेळ्यात सहभाग आहे.    महाराष्ट्राच्या दालनाचं उद्धाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हो...