September 24, 2024 7:45 PM September 24, 2024 7:45 PM
19
४१व्या भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडर्स परिषदेचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
भारतीय तटरक्षक दल ही देशाची पहिली संरक्षण फळी असून देशाच्या विशाल किनारपट्टीचं, तसंच विशेष आर्थिक प्रदेशाचं संरक्षण करण्याची महत्त्वाची जबाबदारी तटरक्षक दल पार पाडतं, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली इथं केलं आहे. भारतीय तटरक्षक दल कमांडर्सच्या ४१व्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दहशतवाद, शस्त्रास्त्रं, अमली पदार्थ आणि मानवी तस्करीला आळा घालण्याचं कामही तटरक्षक दल करत असून अंतर्गत धोक्यांपासून देशाचं संरक्षण करण्यात तटरक्षक दलाचं योगदान अतिशय महत्त्वाचं असल्या...