February 5, 2025 1:21 PM

views 12

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची सर्वाधिक ७७ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ७८ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३४ रौप्य आणि २८ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्राचं तिसरं स्थान कायम असून पहिल्या स्थानावर कर्नाटक तर दुसऱ्या स्थानावर सेना दल संघाचा समावेश आहे. तसंच, मध्यप्रदेश, तामिळनाडू, मणिपूर, हरियाणा, केरळ, दिल्ली आणि पंजाब यांचा पहिल्या दहा संघांत समावेश आहे. यजमान उत्तराखंडचा संघ २७ पदकांसह पदकतालिकेत पंधराव्या स्थानावर आहे.  

February 4, 2025 7:49 PM

views 13

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची सर्वाधिक ७३ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ७३ पदकांची कमाई केली आहे. त्यात १५ सुवर्ण, ३२ रौप्य आणि २६ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्राचं तिसरं स्थान कायम असून पहिल्या स्थानावर कर्नाटक तर दुसऱ्या स्थानावर सेना दलांचा समावेश आहे. तसंच, मणिपूर, मध्य प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, हरयाणा आणि पंजाब यांचा पहिल्या दहा संघांत समावेश आहे.  

February 4, 2025 1:35 PM

views 14

३८व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांच्या पदकतालिकेत कर्नाटकची अव्वल स्थानी झेप

उत्तराखंडमधे सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधे कर्नाटकने काल एका दिवसात ७ पदकं मिळवून पदकतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. तर महाराष्ट्राने पदकांची साठी ओलांडत सर्वाधिक पदकं मिळवण्याचा मान कायम राखला आहे. कर्नाटकाला आतापर्यंत २२ सुवर्ण तर प्रत्येकी दहा रौप्य आणि कांस्य पदकं मिळाली सेनादलांचा संघ १९ सुवर्ण, १० रौप्य आणि ९ कांस्य पदकं मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्राने १५ सुवर्ण , २६ रौप्य आणि २० कांस्य अशी एकूण ६१ पदकं मिळवली आहेत.

February 3, 2025 9:02 PM

views 9

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र १५ सुवर्णासह तिसऱ्या स्थानावर

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज सातव्या दिवशी विविध संघांनी आपल्या खेळाचं शानदार प्रदर्शन केलं. सेना दल संघानं २२ तर कर्नाटकानं १९ सुवर्ण पदकं मिळवली आहेत. तर महाराष्ट्र १५ सुवर्णासह तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र २६ रौप्य आणि २० कांस्य पदकं जिंकून महाराष्ट्रानं सर्वाधिक ६१ पदकं जिंकली आहेत.    मणिपूर ११ सुवर्ण पदकांसह चौथ्या तर मध्यप्रदेश १० सुवर्ण पदकांसह पाचव्या स्थानावर आहे. तामिळनाडू आणि दिल्लीनंही स्पर्धेत चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं आहे. तामिळनाडूने ९ तर दिल्लीने ७ सुवर्ण पदकं जि...

February 3, 2025 3:38 PM

views 30

उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र १३ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र १३ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र २५ रौप्य आणि १७ कांस्य पदकं जिंकून महाराष्ट्राने सर्वाधिक ५५ पदकं जिंकली आहेत. सेना दल संघाला १८ आणि कर्नाटकला १७ सुवर्णपदकं मिळाली आहेत. मात्र सेना दल संघाला १० रौप्य आणि ८ कांस्य तर कर्नाटकला ९ रौप्य आणि ९ कांस्य पदकं असल्याने सेना दल संघ पदकतालिकेत पहिल्या स्थानावर आहे, तर कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आहे. तर मणिपूर ११ सुवर्ण पदकांसह चौथ्या तर मध्यप्रदेश ९ सुवर्ण पदकांसह पाचव्या स्थानावर आहे. तामिळनाडू आणि ...

February 2, 2025 3:22 PM

views 13

38व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधे महाराष्ट्राला सर्वाधिक ४१ पदकं प्राप्त

उत्तराखंडमधे सुरु असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधे आतापर्यंत महाराष्ट्राने सर्वाधिक  ४१ पदकं मिळवली असून त्यात  ११ सुवर्णपदकं आहेत.   सेनादलांचा संघ सर्वाधिक १४ सुवर्णपदकं मिळवून अव्व्ल स्थानी आहे.  कर्नाटक १३ सुवर्णपदकांसह २३ पदकं मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. स्क्वॅशचा अंतिम सामना महाराष्ट्र आणि तमिळनाडूमधे सुरु आहे. 

January 31, 2025 8:01 PM

views 21

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची ३२ पदकांची कमाई

उत्तराखंड इथे सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने आतापर्यंत ३२ पदकांची कमाई केली आहे. यात ७ सुवर्ण, १६ रौप्य आणि ९ कास्य पदकांचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्र पदक तालिकेत मणिपूर, संरक्षण दल आणि कर्नाटकनंतर चौथ्या स्थानावर आहे. १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत पार्थ माने याने सुवर्ण पदक तर रुद्रांश पाटीलनं रौप्य पदक पटकावलं. सेना दलाच्या अंकुश जाधव याने या स्पर्धेत कास्य पदक पटकावलं. खो-खोमध्ये महाराष्ट्राचा पुरुष संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. जलतरणात प्रतिक्षा डांगी, रिषभ दास,...

January 31, 2025 3:52 PM

views 17

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला २५ पदकांची कमाई

उत्तराखंड इथे सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने आतापर्यंत सर्वाधिक २५ पदकांची कमाई केली आहे. यात ५ सुवर्ण, १२ रौप्य आणि ८ कास्य पदकांचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्र पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. आज झालेल्या स्पर्धांमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात पुरुष गटात महाराष्ट्राच्या पार्थ माने याने सुवर्ण पदक मिळवलं आहे. तर, रौप्य पदकही महाराष्ट्राच्या रुद्रांक्ष पाटील याने मिळवलं आहे. सेना दलाच्या अंकुश जाधव याने या स्पर्धेत कास्य पदक पटकावलं. काल झालेल्या १० मीटर एअर राय...

January 30, 2025 7:37 PM

views 16

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये १२ पदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत २३ पदकांसह महाराष्ट्राने तिसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्राच्या खात्यात ४ सुवर्ण, ११ रौप्य आणि ८ कास्य पदकांचा समावेश आहे.    या स्पर्धेत ट्रायथलॉन प्रकारात महाराष्ट्राने सहा पदकांची कमाई केली आहे. वैयक्तिक ट्रायथलॉन, मिश्र रिले आणि डुएथलॉन अशा तिन्ही प्रकारात महाराष्ट्राने २ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य पदकांची कमाई केली आहे. पार्थ मिरगे, डॉली पाटील, मानसी मोहिते या खेळाडूंनी पदकांची कमाई करत महाराष्ट्राच्या पद...

January 28, 2025 8:30 PM

views 27

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

उत्तराखंडमधे, देहरादून इथल्या महाराणा प्रताप स्टेडियमवर ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. सरकार खेळाडूंसाठी जास्तीत जास्त संधी निर्माण करत असून खेळ हे देशाच्या सर्वांगीण विकासाचं प्रमुख अंग आहे, असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं. खेळासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत, असं सांगत खेळासाठी सरकार करत असलेल्या तरतुदींचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला.    खेलो इंडियाच्या माध्यमातून खेळाडूंना पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून दिल...