February 15, 2025 11:03 AM

views 23

उत्तराखंड इथं 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा समारोप

उत्तराखंड इथं सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा काल समारोप झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते, यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण झालं.   उत्तराखंड सरकारनं स्पर्धांचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल शहा यांनी सरकारचं अभिनंदन केलं. 2036 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवण्यासाठी भारत वचनबद्ध असून यासाठी देश पूर्णपणे सज्ज आहे असं शहा यांनी सांगितलं.   39 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मेघालयमध्ये होतील अशी घोषणा त्यांनी...

February 14, 2025 8:15 PM

views 17

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा समारोप

दृढनिश्चय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हे यशाचं गमक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. उत्तराखंड इथे आयोजित ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभावेळी ते बोलत होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी उत्तराखंडचं अभिनंदन केलं, तसंच ग्रीन गेम्स या उपक्रमाचं कौतुकही केलं. २०३६च्या ऑलिंपिक खेळांचं आयोजन करण्यासाठी भारत आता पूर्णपणे तयार असल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं. यंदाच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी ३ हजार ८०० कोटींची तरतूद केल्याचंही ते म्हणाले.   ...

February 10, 2025 8:37 PM

views 18

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची १२४ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक १२४ पदकांची कमाई केली आहे. यात ३१ सुवर्ण, ४५ रौप्य आणि ४८ कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्राचं तिसरं स्थान कायम असून सेनादलं ४४ सुवर्ण पदकांसह पहिल्या तर कर्नाटक ३२ सुवर्णपदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

February 8, 2025 7:15 PM

views 19

३८व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधे १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या संजीवनी जाधव हिला सुवर्णपदक

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक १०७ पदकं जिंकली असून त्यात २३ सुवर्ण, ३९ रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून ३९ सुवर्ण पदकांसह सेना दलं पहिल्या तर ३० सुवर्ण पदकांसह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत आज महिला गटात महाराष्ट्राच्या संजीवनी जाधव हिने सुवर्णपदक पटकावलं असून पुरुषगटात किरण माने याने रौप्य पदक पटकावलं आहे.

February 8, 2025 1:46 PM

views 22

३८व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधे महाराष्ट्राचं पदकांचं शतक पूर्ण

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने पदकांची शंभरी पार केली आहे. महाराष्ट्राकडे सर्वाधिक १०७ पदकं असून त्यात २३ सुवर्ण, ३९ रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत फुटबॉल, मुष्टीयुद्ध आणि तिरंदाजी खेळांमध्ये काल विविध मणिपूर, आसाम आणि महाराष्ट्र या राज्यांनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन केलं. महिला मुष्टियुद्धात महाराष्ट्राच्या दिव्या पवारनं ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. तर उत्तराखंडच्या निवेदिता कार्कीनं लाईट फ्लायवेट प्रकारात सुवर्ण पदक मिळवल...

February 7, 2025 7:27 PM

views 20

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदकतालिकेत पुन्हा तिसऱ्या स्थानावर

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदकतालिकेत पुन्हा तिसऱ्या स्थानावर आला असून महाराष्ट्राकडे सर्वाधिक ९९ पदकं आहेत. त्यात २१ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४० कांस्यपदकांचा समावेश आहे. सेना दलांकडे एकूण ६४ पदकं असून त्यापैकी ३८ सुवर्ण पदकं असल्यानं ते पहिल्या स्थानावर आहेत. तर ३० सुवर्ण पदकांसह कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आहे.

February 7, 2025 5:17 PM

views 16

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकतालिकेत महाराष्ट्राकडे सर्वाधिक ९४ पदकं

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदकतालिकेत पुन्हा तिसऱ्या स्थानावर आला असून महाराष्ट्राकडे सर्वाधिक ९४ पदकं आहेत. त्यात १९ सुवर्ण,३८ रौप्य आणि ३७ कास्यपदकांचा समावेश आहे.

February 6, 2025 7:27 PM

views 14

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदकतालिकेत पुन्हा तिसऱ्या स्थानावर

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदकतालिकेत पुन्हा तिसऱ्या स्थानावर आला असून महाराष्ट्राकडे सर्वाधिक ८८ पदकं आहेत. त्यात १९ सुवर्ण, ३६ रौप्य आणि ३३ कास्यपदकांचा समावेश आहे. तीरंदाजीच्या रिकर्व्ह प्रकारात आज महाराष्ट्राच्या शुकमणी बाबरेकर आणि गाथा खडके यांनी मिश्र गटातलं विजेतेपद पटकावलं. तर महाराष्ट्राच्या महिला तिरंदाजांच्या पथकाने सामूहिक रिकर्व्ह प्रकारात बाजी मारली आहे. या पथकात गाथा खडके, वैष्णवी पवार, शर्वरी शेंडे आणि मुक्ता मोदगी यांचा समावेश आ...

February 6, 2025 1:53 PM

views 17

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची सर्वाधिक ८५ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८५ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३६ रौप्य आणि ३३ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत मात्र महाराष्ट्र चौथ्या स्थानावर गेला आहे. पहिल्या स्थानावर कर्नाटक, त्यानंतर दुसऱ्या स्थानावर सेना दलांचा आणि तिसऱ्या स्थानावर मध्य प्रदेशाचा समावेश आहे. तसंच, हरयाणा, तामिळनाडू, मणिपूर, दिल्ली, केरळ आणि पंजाब यांचा पहिल्या दहा संघांत समावेश आहे. यजमान उत्तराखंडचा संघ ३३ पदकांसह पदकतालिकेत पंधराव्या स्थानावर आहे.

February 5, 2025 8:10 PM

views 9

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८२ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८२ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ३१ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्र चौथ्या स्थानी घसरला असून मध्य प्रदेशनं १७ सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. कर्नाटक २८ सुवर्णपदकं जिंकून पहिल्या स्थानावर, तर सेना दल संघ २७ सुवर्णपदकांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. पाचव्या स्थानावर हरयाणाचा संघ आहे. यजमान उत्तराखंडचा संघ ४ सुवर्णपदकांसह पदकतालिकेत पंधराव्या स्थानावर आहे.