May 12, 2025 1:38 PM May 12, 2025 1:38 PM
3
भारतातील ३२ विमानतळे आता नागरी उड्डाणासाठी सज्ज
भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाणांसाठी बंद केलेली ३२ विमानतळं आता सुरू झाली आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणानं आज पत्रकाद्वारे ही माहिती दिली. याबाबतची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांनी थेट विमान कंपन्यांशी संपर्क साधावा, असंही प्राधिकरणानं सांगितलं आहे.