November 29, 2024 6:49 PM November 29, 2024 6:49 PM

views 10

गोंदिया जिल्ह्यात बस अपघातात ११ जण ठार, मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

गोंदिया जिल्ह्यात आज सकाळी एस टीच्या शिवशाही बसला अपघात होऊन ११ जणांचा मृत्यू झाला तर ३३ जण जखमी झाले. ही बस भंडाऱ्याहून गोंदियाकडे चालली होती. वाटेत सडक अर्जुनी मार्गावर बिंद्रावन टोला या गावानजीक चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस उलटून हा अपघात झाला. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. जखमींना गोंदिया जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी याविषयी सांगितलं.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी तीव्र शोक व्यक्त केला...