January 24, 2026 7:17 PM
9
प्रजासत्ताक दिन संचलनाची रंगीत तालीम संपन्न
७७ व्या प्रजासत्ताक दिन संचलन सोहळ्यासाठी राजधानी नवी दिल्ली सज्ज होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम काल कर्तव्य पथावर झाली. भारताचा समृद्ध वारसा, लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक वैविध्य यांचं प्रतिबिंब या कार्यक्रमात प्रकर्षानं दिसून आलं. संरक्षण दलाच्या विविध कवायत तुकड्या तसंच राज्यं, केंद्रशासित प्रदेश, काही मंत्रालयं आणि विभाग यांचे चित्ररथ पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमधे आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये देशानं मिळवलेला विजय आणि तीनही सैन्य दलांचा समन्वय यांचं दर्शन घडवणारा लष्कराचा चित...