January 16, 2025 8:35 PM January 16, 2025 8:35 PM
2
२५व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत चंद्रपुरातल्या जवाहर नवोदय विद्यालयानं विजेतेपद पटकावलं
२५ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत चंद्रपूर इथल्या जवाहर नवोदय विद्यालयानं विजेतेपद पटकावलं आहे. आज नवी दिल्ली इथं केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते या विद्यालयाला फिरती ढाल आणि करंडक प्रदान करण्यात आला. यावेळी संबंधित विभागांमधे प्रथम आलेल्या ७ नवोदय विद्यालयांनाही मेघवाल यांनी गुणवत्ता करंडक प्रदान केले. त्यात पतियाळा, कोझीकोड, जगतसिंगपूर, सहारनपूर, राजगीर, ईस्ट खांसी हिल - एक, आणि बारमेर इथल्या विद्यालयांचा समावेश आहे.