February 20, 2025 8:03 PM February 20, 2025 8:03 PM
17
२३व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप
गेला आठवडाभर सुरू असलेल्या २३व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप होत आहे. "द रूम नेक्स्ट डोअर" या चित्रपटानं महोत्सवाची सांगता होईल. सांगता समारंभात प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक आणि संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट यासह अन्य विविध विभागात पारितोषिकं दिली जाणार आहेत.