September 3, 2024 3:02 PM September 3, 2024 3:02 PM
12
२३ व्या विधी आयोगाच्या स्थापनेची अधिसूचना जारी
केंद्रसरकारनं काल तेविसाव्या विधी आयोगाच्या स्थापनेची अधिसूचना जारी केली. आयोगाचा कार्यकाल ३ वर्षांचा म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत असेल. आयोगाचे पूर्ण वेळ अध्यक्ष तसंच सदस्य सचिवांसह चार पूर्ण वेळ सदस्य असतील. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे विधी आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य असतील, आणि ते सर्वोच्च न्यायालय अथवा उच्च न्यायालयामधून सेवा निवृत्त होण्याची तारीख अथवा आयोगाच्या कार्यकाळाची समाप्ती, यापैकी आधी जो दिवस असेल, तोपर्यंत पूर्णवेळ कार्यरत राहतील, असं या अधिसूचनेत म्हटलं आहे...