December 8, 2025 8:00 PM December 8, 2025 8:00 PM

views 21

आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिभार विधेयकाला संसदेची मंजुरी

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिभार विधेयक, २०२५' या विधेयकाला आज संसदेची मंजुरी मिळाली. चर्चेनंतर राज्यसभेनं हे विधेयक लोकसभेत परत पाठवलं. गेल्याच आठवड्यात या विधेयकाला लोकसभेची मंजुरी मिळाली होती. हा उपकर अनुचित वस्तूंवरच लागू होणार असून याचं स्वरुप, उत्पादन शुल्क प्रकारचं नसेल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत विधेयक मांडताना स्पष्ट केलं. गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी लादण्याची मागणी काँग्रेस खासदार शक्तीसिंह गोहिल यांनी या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान केली. श...

August 1, 2025 1:24 PM August 1, 2025 1:24 PM

views 12

बँकिंग कायदा सुधारणा अधिनियम 2025 आजपासून लागू

बँकिंग क्षेत्रात प्रशासकीय सुधारणांसाठी तसंच ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना अधिकाधिक संरक्षण देण्याच्या उद्देशानं बँकिंग कायदा सुधारणा अधिनियम २०२५ आजपासून लागू होत आहे. हा कायदा यावर्षी १५ एप्रिलला अधिसूचित करण्यात आला होता. सार्वजनिक क्षेत्रांतल्या बँकांमध्ये लेखापरीक्षणाची गुणवत्ता वाढवणं आणि सहकारी बँकांमधे अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालकांव्यतिरिक्त इतर संचालकांच्या कार्यकाळात वाढ करण्याची तरतूद यात आहे, असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.

July 1, 2025 3:40 PM July 1, 2025 3:40 PM

views 18

संत तुकाराम महाराज पालखीचं आज सोलापूर जिल्ह्यात आगमन

संत तुकाराम महाराज पालखीचं आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं. जिल्हा प्रवेशानंतर माळशिरस तालुक्यात अकलूज इथल्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात गोल रिंगण झाले. त्यानंतर अश्व रिंगण झालं. यावेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली तर पोलिसांच्या बँड पथकानेही पालखीचं स्वागत केलं.   तसेच यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्वाचं आणि पादुकांचं पूजन जिल्हाधिकारांच्या हस्ते करण्यात आलं. विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातले वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीनं चालत आहेत.