April 2, 2025 11:28 AM April 2, 2025 11:28 AM

views 20

२००० रुपयांच्या ९८ टक्क्यांहून अधिक नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा

आतापर्यंत २००० रुपयांच्या ९८ टक्क्यांहून अधिक नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या असून, ६ हजार ३ शे ६६ कोटी रुपये मूल्यांच्या नोटा अद्यापही लोकांकडे आहेत माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे.   रिझर्व्ह बँकेने १९ मे, २०२३ रोजी २००० रुपये मूल्याच्या चलनी नोटा बँकेकडे परत करण्याचा आदेश जारी केला होता. या नोटा परत करण्याची मुदत ७ ऑक्टोबर २०२३ पर्यन्त होती; तथापि रिझर्व्ह बँकेच्या १९ कार्यालयांमधे या नोटा बदलण्याची सुविधा अद्यापही उपलब्ध आहे.