January 22, 2026 10:19 AM

views 12

न्यूझीलंडविरुद्ध वीस षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा ४८ धावांनी विजय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात काल पाच सामन्यांच्या मालिकेतील नागपूर इथं झालेला पहिला २० षटकांचा सामना भारतानं ४८ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं अभिषेक शर्माच्या ३५ चेंडूतील तडाखेबंद ८४ आणि रिंकू सिंगच्या २० चेंडूतील ४४ धावांचा जोरावर पाहुण्यांसमोर 240 धावांचं आव्हान दिलं होतं. न्युझीलँडचा डाव १९० धावांवर संपुष्टात आला. ग्लेन फिलिप्स याने सर्वाधिक ७८ धावा केल्या. शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. अभिषेक शर्मा याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.