October 2, 2025 6:12 PM October 2, 2025 6:12 PM
54
भारतानं वेस्ट इंडीजचा पहिला डाव १६२ धावात गुंडाळला
भारत-वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं आज पहिल्याच दिवशी वेस्ट इंडीजचा पहिला डाव १६२ धावात गुंडाळला, आणि दिवसअखेर २ गडी गमावून १२१ धावा केल्या. अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र त्यांचे फलंदाज चांगली कामगिरी करु शकले नाहीत. जस्टीन ग्रीव्हच्या ३२ धावा ही त्यांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. सामन्यातले ३५ चेंडू बाकी असताना १६२ धावांवर त्यांचा डाव आटोपला. भारतातर्फे मोहंमद सिराजनं ४, जसप्र...