February 22, 2025 7:49 PM February 22, 2025 7:49 PM
40
१९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं छत्रपती संभाजीनगर इथं उद्घाटन
१९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं आज छत्रपती संभाजीनगर इथं उद्घाटन झालं. त्यापूर्वी औरंगपुरा भागातून साहित्यदिंडी काढण्यात आली. पारंपरिक ढोल ताशाच्या निनादात आदिवासी नृत्यावर फेर धरलेल्या नागरिकांनी शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं. संमेलनाचे उद्घाटक कंवल भारती यांनी या संमेलनाला शुभेच्छा दिल्या. संमेलनाध्यक्ष अशोक राणा यांनी छत्रपती संभाजीनगरात भरलेल्या या संमेलाचं अध्यक्षपद भुषवतांना आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. आमखास मैदानावर मलिक अंबर साहित्य नगरीत भरलेल्या या संमेलनात भरगच्च कार्यक्रम...