August 19, 2024 1:13 PM August 19, 2024 1:13 PM
15
झिम्बावेचे उपाध्यक्ष कॉन्ट्याटिनो गुवेया यांचे १९ वी सीआयआय भारत अफ्रिका व्यापार परिषदेसाठी नवी दिल्लीत आगमन
१९ वी सीआयआय भारत अफ्रिका व्यापार परिषद उद्या नवी दिल्लीत होत असून या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी झिम्बावेचे उपाध्यक्ष कॉन्ट्याटिनो गुवेया यांचे आज नवी दिल्लीत आगमन झालं. त्याच्या उपस्थितीमुळे भारत आणि झिम्बावे याच्यातील परस्पर संबंध अधिक दृढ होतील, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. याद्वारे भारत आणि अफ्रिकेतील परस्पर सहकार्याची भावना अधिक मजबूत होईल असंही ते म्हणाले.