July 6, 2024 11:34 AM July 6, 2024 11:34 AM

views 12

बिहारमध्ये गेल्या 24 तासात वीज पडून 19 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये गेल्या 24 तासांत वीज पडून 19 जणांचा मृत्यू झाला असून, 7 जण जखमी झाले आहेत. पाऊस सुरू असताना शेतात काम करणाऱ्या आणि झाडाखाली थांबलेल्या लोकांवर वीज पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला.   राज्याच्या उत्तर, आग्नेय आणि दक्षिण मध्यवर्ती भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून पुढील 24 तासांसाठी पिवळा बावटा जारी केला आहे.