August 9, 2024 8:05 PM August 9, 2024 8:05 PM
15
हर घर तिरंगा अभियानाला देशभरात प्रारंभ/ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांना देशाची आदरांजली
९ ऑगस्ट या क्रांती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्या सैनिकांना आदरांजली वाहिली असून आजपासून हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे. आज ९ ऑगस्ट म्हणजे क्रांती दिनापासून ते १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनापर्यंत देशभरात हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. या काळात नागरिकांनी आपल्या घरावर डौलाने तिरंगा फडकवावा आणि त्याबरोबर सेल्फी घेऊन तो फोटो हर घर तिरंगा या संकेतस्थळावर अपलोड करावा, असं आवाहन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गज...