March 13, 2025 8:57 PM

views 26

१२ वीच्या परीक्षा शनिवारी वेळापत्रकानुसार होणार – CBSE

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या शनिवारी होणाऱ्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मंडळानं हे स्पष्ट केलं आहे. या दिवशी मूळ हिंदी आणि वैकल्पिक हिंदी विषयांच्या परीक्षा होणार आहेत.

January 19, 2025 9:31 AM

views 23

दहावी-बारावी प्रवेशपत्रावरील जाती प्रवर्ग काढला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आयोजित इयत्ता बारावी परीक्षा प्रवेश पत्रावरील जातीचा प्रवर्ग काढून टाकण्याचा निर्णय राज्य मंडळानं घेतला आहे.   याबाबत विविध स्तरात नाराजी व्यक्त केल्यानंतर मंडळानं हा निर्णय घेतला असून दिलगिरीही व्यक्त केली आहे. नवीन प्रवेशपत्र 23 जानेवारीपासून उपलब्ध होतील. इयत्ता दहावीच्या प्रवेशपत्रातही हा बदल करण्यात येणार असून त्याची प्रवेशपत्रं उद्या दुपारी तीन वाजल्यापासून संबंधित शाळांना उपलब्ध होतील.

October 30, 2024 5:41 PM

views 19

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं, फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ही मुदत आजपर्यंत होती. आता ३१ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.  अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रीलिस्ट २७ नोव्हेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करायच्या असल्याचं मंडळाच्या प्रसिद्धिपत्रकात स्प...