June 5, 2025 1:38 PM June 5, 2025 1:38 PM

views 9

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्ष पूर्ण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्ष पूर्ण झाली असून या कार्यकाळात देशातल्या जनतेची आर्थिक क्षमता सुधारण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्जवला योजना, जन धन योजना आणि आयुष्यमान भारत सारख्या विविध योजना शासनाने सुरू केल्या. या योजनांचा लाभ २५ कोटींहून अधिक जनतेनं घेतला असून देशातल्या पायाभूत सोयीसुविधा आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्यावर केंद्रसरकार जोर देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.