December 31, 2025 2:34 PM December 31, 2025 2:34 PM
7
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचं दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. दहावीची परीक्षा पुढच्या वर्षी ११ मार्चपासून सुरू होईल. तर बारावीच्या परीक्षेची तारीख १० एप्रिल असेल. यापूर्वी या दोन्ही परीक्षा ३ मार्च रोजी होणार होत्या. प्रशासकीय कारणांमुळे वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचं मंडळाने म्हटलं आहे. संलग्न असलेल्या सर्व शाळांनी ही माहिती आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना द्यावी अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत.