January 16, 2025 9:03 PM

views 18

चित्रपटाच्या माध्यमातून देशाची समृद्ध परंपरा देशातल्या नागरिकांपर्यंत पोहोचत आहे – संजय जाजू

चित्रपटाच्या माध्यमातून देशाची समृद्ध परंपरा देशातल्या नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १०व्या अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ते बोलत होते. देशाच्या कानाकोपऱ्यात चित्रपट महोत्सवांची वाढती संख्या, चित्रपट, संगीत, नाटक आणि नृत्य याविषयी लोकांना असलेली रुची दाखवून देत असल्याचं त्यांनी सांगितलं.

December 28, 2024 8:05 PM

views 13

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज घोषणा करण्यात आली. येत्या  १५ ते १९ जानेवारी २०२५ या दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांना जाहीर करण्यात आला आहे.