January 19, 2025 9:31 AM

views 23

दहावी-बारावी प्रवेशपत्रावरील जाती प्रवर्ग काढला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आयोजित इयत्ता बारावी परीक्षा प्रवेश पत्रावरील जातीचा प्रवर्ग काढून टाकण्याचा निर्णय राज्य मंडळानं घेतला आहे.   याबाबत विविध स्तरात नाराजी व्यक्त केल्यानंतर मंडळानं हा निर्णय घेतला असून दिलगिरीही व्यक्त केली आहे. नवीन प्रवेशपत्र 23 जानेवारीपासून उपलब्ध होतील. इयत्ता दहावीच्या प्रवेशपत्रातही हा बदल करण्यात येणार असून त्याची प्रवेशपत्रं उद्या दुपारी तीन वाजल्यापासून संबंधित शाळांना उपलब्ध होतील.