September 25, 2024 9:45 AM September 25, 2024 9:45 AM

views 8

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शंभर दिवस पूर्ण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या केंद्रातील सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. या शंभर दिवसांच्या काळात या सरकारनं पायाभूत सुविधा, शेतकरी, मध्यमवर्ग, महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रित करून 15 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत. सरकारनं देशातील युवा शक्तीला सक्षम करण्यासाठी, त्यांच्या आकाक्षांना पंख देण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. या शंभर दिवसांमध्ये, केंद्र सरकारनं कौशल्य वाढविण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी प्रधानमंत्री पॅकेज अंतर्गत दोन लाख कोटी ...

September 24, 2024 11:00 AM September 24, 2024 11:00 AM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारचा महिला सक्षमीकरणावर भर

तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं पहिले 100 दिवस पूर्ण केले आहेत. या काळात, सरकारनं पायाभूत सुविधा, समाजकल्याण, शेतकरी, मध्यमवर्ग, महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रित करून 15 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत. यांमध्ये विशेषत: ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या उद्देशानं अनेक उपक्रमांसह महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा भक्कम पाया सरकारनं घातला आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत 90 ल...

September 21, 2024 3:02 PM September 21, 2024 3:02 PM

views 11

लोककल्याणकारी योजनांसाठी १५ लाख कोटी रुपयांची तरतूद – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांत लोककल्याणकारी योजनांसाठी १५ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितलं. तामिळनाडू मधल्या थुथुकुडी इथं आज ते बोलत होते. पायाभूत सुविधांसाठी तीन लाख कोटी तसंच रेल्वेच्या विकासासाठी ६३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.    

September 18, 2024 9:58 AM September 18, 2024 9:58 AM

views 9

नरेंद्र मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ ऐतिहासिक असल्याचं मंत्री किरेन रिजिजू यांचं प्रतिपादन

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी नरेंद्र मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ ऐतिहासिक असल्याचं म्हटलं असून पहिल्या १०० दिवसांमध्ये सरकारने लोकांच्या कल्याणासाठी १५ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे. आकाशवाणीशी विशेष संवाद साधताना रिजिजू म्हणाले की, सरकार ३ लाख कोटी रुपये नारी शक्तीसाठी आणि २ लाख कोटी रुपये युवकांना कौशल्य आणि प्रशिक्षण देण्यासाठी खर्च करणार आहे.