June 2, 2025 8:12 PM June 2, 2025 8:12 PM

views 25

दहशतवाद विरोधी पथकाकडून ठाणे जिल्ह्यात १२ संशयितांना अटक

दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं ठाणे जिल्ह्यात छापेमारी करून १२ संशयितांना अटक केली. दहशतवाद विरोधी पथकानं साकिब नाचण, अकिब साकिब नाचण, अब्दुल लतीफ कासकर, कैफ नाचण, शाजील नाचण, फारक झुबेर मुल्ला यांच्यासह प्रतिबंधित संघटना सिम्मीच्या काही माजी पदाधिकाऱ्यांच्या घरांची आणि परिसराची झडती घेतली. झडती दरम्यान ६ जण त्यांच्या घरात आढळले नाहीत. ए टी एस नं पुढील तपासासाठी १२ जणांना अटक केलं आहे.

May 12, 2025 9:47 AM May 12, 2025 9:47 AM

views 6

ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात 100पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रतिनिधींनी काल दिली. लष्करी कार्यवाही महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई, हवाई कार्यवाही महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती आणि नौदल कार्यवाही महासंचालक व्हाइस ॲडमिरल ए. एन. प्रमोद यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत भारताच्या हवाई हल्ल्याविषयी आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाविषयीचे तपशील समोर ठेवले.   ठार झालेल्...