April 22, 2025 2:57 PM April 22, 2025 2:57 PM
12
देशात सोन्याच्या दराने गाठला तोळ्यामागे १ लाख रुपयांचा टप्पा
देशात सोन्याच्या किमतींनी आज तोळ्यामागे १ लाख रुपयांची पातळी ओलांडली. इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशनने दिलेल्या दरांनुसार सकाळी व्यवहार सुरू झाला तेव्हा २४ कॅरेट सोनं प्रति तोळा १ लाख २ हजार रुपयांपेक्षा महाग मिळत होतं. २२ कॅरेट सोन्याचे दर १ लाख १ हजार ६०० रुपयांपेक्षा अधिक झाले होते. कालच्या तुलनेत सोनं सुमारे अडीच हजार रुपयांनी महागलं. चांदी सुमारे ९८ हजार ८०० रुपये किलोनं मिळत होती. कमोडिटी बाजारातही सोन्याचे व्यवहार १ लाख रुपयांच्यावर होत आहेत. जगभरातल्या केंद्रीय बँकांन...