November 13, 2024 9:34 AM November 13, 2024 9:34 AM

views 4

२०२४ हे आतापर्यंतचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता

दर महिन्याच्या जागतिक सरासरी तापमानात मोठी वाढ दिसून येण्याचा कालावधी लांबल्यामुळे २०२४ हे आतापर्यंतचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे. कॉप २९ परिषदेत जागतिक हवामान संस्थेनं सादर केलेल्या अहवालात हे नमूद केलं असून पॅरीस करारातली उद्दीष्टं धोक्यात असल्याचं म्हटलं आहे. या उद्दीष्टानुसार जागतिक सरासरी तापमानवाढ २ अंश सेल्सिअसपेक्षा कमी राखणं अपेक्षित आहे आणि ही वाढ दीड अंशापेक्षा कमी राखण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहण्याचा निर्धार पॅरीस करारात करण्यात आला होता. मात्र गेल्या सहा महिन्यातल...