June 18, 2025 2:20 PM June 18, 2025 2:20 PM

views 13

जर्मनी इथे होणाऱ्या हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारताचा कनिष्ठ पुरुष हॉकी संघ बेंगळुरूहून रवाना

जर्मनी इथे होणाऱ्या ४ राष्ट्रांच्या हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज भारताचा कनिष्ठ पुरुष हॉकी संघ बेंगळुरूहून रवाना झाला. कर्णधार अराईजित सिंह हुंडल याच्या नेतृत्वाखाली हा संघ येत्या २१ जून रोजी यजमान जर्मनी संघाबरोबर लढत देईल. त्यानंतर २२ जून रोजी ऑस्ट्रेलिया आणि २४ जून रोजी स्पेनशी या संघाचा सामना होणार आहे.  

July 29, 2024 9:48 AM July 29, 2024 9:48 AM

views 8

कनिष्ठ गटाच्या हॉकी इंडिया विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष या दोन्ही संघांना उपविजेतेपद

छत्तीसगडमध्ये झालेल्या कनिष्ठ गटाच्या हॉकी इंडिया विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष या दोन्ही संघांना उपविजेतेपद मिळालं आहे. पुरुष गटात हॉकी मध्य प्रदेशकडून महाराष्ट्र हॉकी संघाचा 4-6 असा पराभव झाला; तर महिला गटात मध्यप्रदेश संघानेच पेनल्टी शूट आउटमध्ये महाराष्ट्रावर 4-2 अशी मात केली.