April 15, 2025 3:39 PM

views 17

आज आहे हिमाचल प्रदेश चा स्थापना दिवस

हिमाचल प्रदेश आज ७७वा स्थापना दिन साजरा करत आहे. ३० छोट्या छोट्या राजघराण्यांची संसथानं एकत्र करुन 15 एप्रिल 1948 रोजी हिमाचल प्रदेशची स्थापना झाली होती. यावर्षी राज्य स्थापना दिवसाचा मुख्य शासकीय कार्यक्रम चंबा जिल्ह्यात पांगी या डोंगराळ भागातल्या किल्लार या आदिवासी गावात होणार आहे.अशाप्रकारे डोंगराळ आदिवासी पांगी भागात प्रथमच हा शासकीय कार्यक्रम होत असून मुख्यमंत्री सुखविन्दर सुखू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशच्या सथापना दिनानिमित्त शुभ...

August 10, 2024 1:55 PM

views 15

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानच्या पूर्व भागात या आठवड्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानच्या पूर्व भागात या आठवड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा भारतीय हवामानशास्त्रविभागाचा अंदाज आहे. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंडीगढ, दिल्ली आणि राजस्थानच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्यप्रदेशच्या पूर्व भागात तुरळक ठिकाणीजोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व आणि ईशान्य भारतातही हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे.