September 27, 2024 2:27 PM

views 13

हिजबुल्लाहचा कमांडर मोहम्मद हुसेन स्रुर इस्राइलच्या हवाई हल्ल्यात ठार

हिजबुल्लाह चा कमांडर मोहम्मद हुसेन स्रुर काल इस्राइलच्या हवाई हल्ल्यात मारला गेला. लेबननची राजधानी बैरुतमध्ये इस्राइलनं काल अनेक हवाई हल्ले केला. त्यात तो ठार झाल्याची माहिती इस्राइलच्या लष्करानं दिली आहे. इस्राइलवर हवाई हल्ले करणं, ड्रोन आणि क्रुझ क्षेपणास्र टाकण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. लेबननमध्ये ड्रोन उत्पादन केंद्र स्थापन केल्याचा आरोप त्याच्यावर होता.  या संघर्षात हजारो लोक विस्थापित झाले असून अनेक जण सीरियात जाण्याच्या प्रयत्नात आहेत. लेबनन आणि इस्राइलमधले युद्ध वाढलं तर नागरिकांना ...

September 23, 2024 8:24 PM

views 14

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार झाले असून ७२७ जण जखमी झाले आहेत. यात बालकं, महिला, आणि आरोग्यसेवकांचा समावेश असल्याचं लेबननच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. लेबननमधल्या ३०० ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती इस्रायली सैन्यानं दिली आहे.    दुसऱ्या बाजूला, हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेनं इस्रायलच्या उत्तर भागातल्या लष्करी तळांवर आणि रसद गोदामांवर क्षेपणास्त्र डागली आहेत. इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं हिजबुल्लाहनं म...