June 18, 2025 9:15 AM June 18, 2025 9:15 AM

views 11

हिंगोलीत संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं अश्व रिंगण संपन्न

हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथल्या संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळ्याचं पहिचं अश्व रिंगण काल हिंगोलीच्या रामलीला मैदानावर पार पडलं. १२ अश्वांच्या माध्यमातून पार पडलेल्या रिंगण सोहळ्याला हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. आज ही पालखी औंढा नागनाथ मार्गे रवाना होणार आहे. दरम्यान, आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या दिंड्यांमध्ये अंध वारकऱ्यांची दिंडी लक्ष वेधून घेत आहे. वाशीम जिल्ह्यातून निघालेली ही दिंडी सध्या परभणी जिल्ह्यातून मार्गक्रमण करत आहे. या वारीत पाच महिलांसह एकूण पंधरा वारकरी आहे...

February 6, 2025 3:52 PM February 6, 2025 3:52 PM

views 11

हिंगोली – बसने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जण ठार

भरधाव वेगाने जाणाऱ्या विनक्रमांकाच्या स्कूल बसने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव- रिसोड रस्त्यावर काल घडली. या अपघातात जखमी झालेल्या दोघांना सेनगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शोरुममधून निघालेल्या या स्कूल बसचं रजिस्ट्रेशनही झालेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. बसचालक फरार आहे.  

November 11, 2024 11:07 AM November 11, 2024 11:07 AM

views 17

हिंगोली जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात, पहिल्या दिवशी ७०० ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांचं मतदान

हिंगोली जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात झाली असून, काल पहिल्या दिवशी ७०० ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी मतदान केलं. गृह मतदानासाठी जिल्ह्यातून एक हजार ७० जणांनी नोंदणी केली आहे. सेनगाव तालुक्यातल्या हुळी इथं १०२ वर्षे वयाच्या आजोबांनी, तसंच ८७ वर्षीय पारूबाई पोले यांनी मतदानाचा हक्क बजावला.  

October 10, 2024 12:59 PM October 10, 2024 12:59 PM

views 9

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत हिंगोली जिल्हा राज्यात अव्वल

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत हिंगोली जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले तसंच महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांचा उद्या ११ ऑक्टोबरला मुंबईत सत्कार केला जाणार आहे.

October 9, 2024 11:10 AM October 9, 2024 11:10 AM

views 11

हिंगोली इथं जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी काल आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा

हिंगोली इथं जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी काल आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकार्यांनी निवडणुकीच्या घोषणेपासून ते मतदानाचा निकाल जाहीर करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर कामाचं सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

September 26, 2024 11:56 AM September 26, 2024 11:56 AM

views 10

“स्वछता ही सेवा” पंधरवड्या निमित्त हिंगोली नगरपालिका कार्यालयात राबवण्यात येत आहेत विविध उपक्रम

“स्वछता ही सेवा” पंधरवड्या निमित्त हिंगोली नगरपालिका कार्यालयात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत काल रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. ३२ स्पर्धकांनी यात सहभाग घेत, स्वच्छता ही सेवा, प्लास्टिक मुक्त हिंगोली शहर, स्वच्छ सुंदर आणि हरित हिंगोली, ईत्यादी विषयांवर रांगोळ्या काढल्या.