April 17, 2025 2:47 PM April 17, 2025 2:47 PM

views 20

राजस्थान आणि गुजरातमधल्या अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा हवामान विभागाचा इशारा

राजस्थान आणि गुजरातमधल्या अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, केरळ, माहे, आणि गुजरातच्या काही भागात उष्ण आणि दमट वातावरण असेल असा अंदाज आहे. तर बिहार , आसाम आणि मेघालयच्या काही भागात जोरदार पाऊस पडेल असं हवामान विभागानं कळवलं आहे. सिक्कीम, झारखंड, ओदिशा, आसाम, मेघालय, नागालँड आणि मणिपूर मधे ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. केरळ, माहे, आंध्रप्रदेश, यानम आणि दक्षिण कर्नाटमधेही हीच स्थिती असेल. ...

April 1, 2025 9:41 AM April 1, 2025 9:41 AM

views 18

राज्याच्या काही भागात पुढील चार दिवस पावसाचा इशारा – हवामान विभाग

राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

February 6, 2025 1:55 PM February 6, 2025 1:55 PM

views 5

अरुणाचलप्रदेश आणि आसाममध्ये पुढीलं दोन दिवस पडणार जोरदार पाऊस – हवामान विभाग

ईशान्य भारतात अरुणाचलप्रदेश आणि आसाममध्ये पुढले दोन दिवस जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्यप्रदेशात राजधानी भोपळसह इतर भागात थंडीचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे, तरी पुढले काही दिवस सकाळ आणि रात्रीच्या तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस घट होईल असा अंदाज आहे. राजस्थानमध्ये गेले काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे थंडीचा जोर आणखी वाढेल असा अंदाज आहे. सीकर, चूरू, झुंझुनूं आणि नागौर इथं आज थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

January 15, 2025 10:02 AM January 15, 2025 10:02 AM

views 9

पंजाब, हरयाणा, चंदीगढ, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात आज वीजांसह वादळी वारे वाहण्याचा हवामान विभागाचा अंदाज

पंजाब, हरयाणा, चंदीगढ, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात आज वीजांसह वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन दिवस उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टि होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली असून, मध्य भारत आणि महाराष्ट्रातील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सियसने वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.  

December 3, 2024 2:33 PM December 3, 2024 2:33 PM

views 12

पुढच्या तीन दिवसात राज्याच्या अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता – हवामान विभाग

फेंगल चक्रिवादळामुळे पुढच्या तीन दिवसात महाराष्ट्राच्या अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढच्या दोन दिवसांसाठी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट असून वातावरण उष्ण आणि ढगाळ राहील अशी शक्यता आहे. या पावसामुळे काजू आणि आंबा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.  

September 27, 2024 3:32 PM September 27, 2024 3:32 PM

views 11

पावसामुळे राज्यात गेल्या चोवीस तासात ३ जणांचा मृत्यू

 पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये राज्यात गेल्या चोवीस तासात ३ जण मरण पावले असून ६ जण जखमी झाले आहेत. राज्यातल्या विविध धरणात ८८ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी या कालावधीत हे प्रमाण सुमारे ७१ टक्के होतं.    मुंबईच्या अनेक भागांत आज सकाळी जोरदार पाऊस झाला. मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट लागू असून विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आज सकाळपर्यंत संपलेल्या चोवीस तासात मुंबईत ४३ मिलीमीटर तर उपनगरात ७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सखल भा...

September 25, 2024 9:20 AM September 25, 2024 9:20 AM

views 12

राज्याच्या विविध भागात उद्यापर्यंत अतिवृष्टिचा इशारा

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उद्यापर्यंत जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार ते अतिवृष्टिचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भुईबावडा घाटात दोन ठिकाणी दरड कोसळली. दरड हटवली असली तरी काही ठिकाणी रस्ता वाहून गेल्यानं अवजड वाहनांसाठी हा घाट बंद ठेवण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात कालही पावसानं जोरदार हजेरी लावली. जाफ्राबाद तालुक्यात ...

July 13, 2024 3:14 PM July 13, 2024 3:14 PM

views 7

पुढील ३ दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, रायलसीमा, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं पुढील ३ दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, रायलसीमा, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं उद्यापर्यंत आसाम, मेघालय, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, उत्तराखंड, पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेशात तर राजस्थान, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, नागालँड आणि मणिपूरच्या काही भागात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. आंध्र प्रदेश किनीरपट्टी, तेलंगणा, मराठव...

July 6, 2024 7:39 PM July 6, 2024 7:39 PM

views 17

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी काल मुसळधार पाऊस

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी काल मुसळधार पाऊस झाला. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकणात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची तर बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर याच कालावधीत सोसाट्याचा वारा वाहू शकतो. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा तर बऱ्याच ठिकाणी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे.  

June 23, 2024 11:22 AM June 23, 2024 11:22 AM

views 10

कोकण, मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा

कोकण, मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी आणि जोराचे वारे वाहण्याचा अंदाज आहे तसंच विदर्भातही जोराच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पिवळा बावटा तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला नारिंगी बावटा जारी करण्यात आला आहे.