August 16, 2025 3:17 PM August 16, 2025 3:17 PM

views 18

मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसरात रेड अलर्ट

मुंबई आणि परिसरामध्ये कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसात २ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले. मध्यरात्री सुमारे २ वाजता एका घरावर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली.  आज सकाळी साडे ८ वाजता संपलेल्या २४ तासात सांताक्रूझ वेधशाळेत २४४ मिलिमीटर तर कुलाब्यात ८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सांताक्रूझमध्ये ऑगस्टमध्ये एका दिवसात झालेल्या सर्वाधिक पावसाचा हा गेल्या ५ वर्षातला विक्रम आहे. यापूर्वी ४ ऑगस्ट २०२० रोजी २६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. विक्रोळी, सांताक्रूझ, सायन आणि जुहू या परिसरांमध्य...

April 9, 2025 10:23 AM April 9, 2025 10:23 AM

views 51

राज्यात येत्या २-४ दिवसात कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

राज्याच्या बहुतांश भागात सध्या तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. अकोला इथं काल राज्यातील सर्वात जास्त 44 पूर्णांक 2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यात येत्या 2-4 दिवसात कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.  

January 16, 2025 2:08 PM January 16, 2025 2:08 PM

views 18

दिल्लीत संध्याकाळपर्यंत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता – हवामान विभाग

दिल्ली आणि परिसरात आज सकाळी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे तापमानात घट झाली असली तरी दृश्यमान्यता सुधारली आहे. दिल्लीत संध्याकाळपर्यंत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं दिली आहे. पश्चिमेला होत असलेल्या हवामान बदलाचा फटका राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीला बसत असल्याची माहिती हवामान संशोधक डॉ. आरके जेनामनी यांनी दिली.

November 10, 2024 10:40 AM November 10, 2024 10:40 AM

views 21

आज सर्वत्र हवामान कोरडं राहील, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात काल सर्वात कमी किमान तापमान नाशिक इथं 14 पूर्णांक 7 दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. आज सर्वत्र हवामान कोरडं राहील आणि किमान तापमान सरासरीच्या आसपास असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  

August 26, 2024 7:55 PM August 26, 2024 7:55 PM

views 14

येत्या दोन दिवसात, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता

येत्या दोन दिवसात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी विदर्भात अनेक ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात, कोकणात किनारपट्टीवर वारे वाहण्याची तसंच तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

August 24, 2024 4:01 PM August 24, 2024 4:01 PM

views 17

गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरम इथं उद्या अतिवृष्टी होण्याचा इशारा

गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरम इथं उद्या अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, झारखंड, ओदिशा, पश्चिम बंगाल, मेघालय आणि पूर्व राजस्थानात मुसळधार पावसाची शक्यताही हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. तर उत्तर प्रदेश, पश्चिम राजस्थान, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि बिहार इथं आठवड्याभरात मुसळधार पावसाची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे.

August 19, 2024 7:48 PM August 19, 2024 7:48 PM

views 22

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता -हवामान विभाग

गेल्या चोवीस तासात, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.  येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पड्ण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

June 17, 2024 1:40 PM June 17, 2024 1:40 PM

views 62

२२ जूननंतर मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

पुण्यासह राज्याच्या विविध भागातून नाहीसा झालेला मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून प्रामुख्यानं घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जूनच्या पहिल्या ८ दिवसात चांगल्या पद्धतीनं बरसलेला मोसमी पाऊस गेल्या आठवडाभरापासून नाहीसा झाला आहे. त्यामुळं शेतीची कामं देखील खोळंबलेली आहेत. राज्यातील अनेक मोठ्या धरणांनी तळ गाठला असून कोयना धरणातील वीज निर्मिती देखील बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागानं...

June 13, 2024 7:52 PM June 13, 2024 7:52 PM

views 45

राज्यात मोसमी पावसासाठी अनुकूल परिस्थिती

नैऋत्य मोसमी पाऊस पुढच्या तीन चार दिवसात राज्याच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.    येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.   गेल्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला.