July 24, 2024 7:26 PM July 24, 2024 7:26 PM

views 16

जागतिक पातळीवर हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करावं – मुख्यमंत्री 

जागतिक पातळीवर हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करावं असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई इथं दिले. ते सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या हळद संशोधन केंद्राबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते.   हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथे आगामी ३ वर्षात सुरु होणार असलेल्या देशातल्या पहिल्या हळद संशोधन केंद्रामुळे मराठवाडा आणि विदर्भासारख्या दुष्काळग्रस्त भागात सुवर्णक्रांती होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या केंद्रासाठी ८०० क...