August 14, 2024 6:54 PM August 14, 2024 6:54 PM
18
राज्यभरात तिरंगा यात्रांमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग
हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज नवी मुंबईतल्या विविध भागात तिरंगा यात्रा काढण्यात आल्या होत्या. या यात्रांमध्ये विद्यार्थी, महिला, युवक तसंच नागरिकांसह सायकलपटूही मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक महापालिकेनं तिरंगा पदयात्रा आयोजित केली होती. या पदयात्रेदरम्यान स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सत्कार करण्यासह हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचं आवाहन नाशिकच्या जिल्हाधिका...