November 6, 2024 11:04 AM November 6, 2024 11:04 AM

views 5

नवनिर्वाचित हरियाणा विधानसभेचं पहिलं अधिवेशन येत्या 13 तारखेपासून होणार सुरू

नवनिर्वाचित हरियाणा विधानसभेचं पहिलं अधिवेशन येत्या 13 तारखेपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाची पहिली बैठक सकाळी अकरा वाजता सुरू होईल, असं हरियाणा विधानसभेच्या सचिवालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या अधिवेशनाची पूर्व तयारी सुरू असून, कामकाज सल्लागार समितीची बैठकीत अधिवेशनातील कामकाजाची चर्चा करण्यात येणार आहे, असं विधानसभा अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी सांगितलं.  

October 12, 2024 8:18 PM October 12, 2024 8:18 PM

views 8

जम्मू काश्मीरमध्ये १६ ऑक्टोबर आणि हरियाणामधे १७ ऑक्टोबरला नवीन सरकारचा शपथविधी

हरियाणामधे नवीन सरकारचा शपथविधी येत्या गुरुवारी १७ ऑक्टोबरला होणार आहे अशी माहिती काळजीवाहू मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी दिली. लडवा इथं आज ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्यासह काही मंत्री पंचकुलामध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपाचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित  राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.    जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल  कॉन्फरन्सच्या नेतृत्त्वाखालच्या आघाडीनं काल सत्ता स्थापनेचा दावा नायब राज्यपाल मनोज स...

September 28, 2024 8:39 PM September 28, 2024 8:39 PM

views 11

हरियाणामधल्या सोनीपतमध्ये बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे तीन जणांचा मृत्यू

हरियाणामधल्या सोनीपतमध्ये बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटामुळे परिसरातल्या घरांच्या भिंतींना तडे गेल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहराने सांगितलं आहे.