October 3, 2024 8:15 PM October 3, 2024 8:15 PM
8
हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी येत्या ५ ऑक्टोबरला मतदान
हरयाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज थंडावला. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी येत्या ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. आज प्रचारासाठीच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला. भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जींद जिल्ह्यात तीन ठिकाणी जन आशीर्वाद रॅलीत सहभागी होत, भाजपा उमेदवारांसाठी मतं मागितली. भाजपाच्या शहाबाद इथल्या प्रचारसभेत खासदार नवीन जिंदाल सहभागी झाले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी, खासदार दीपेंद्र हुड्डा, राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सि...