February 4, 2025 2:21 PM February 4, 2025 2:21 PM

views 18

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षल्यांनी दोन गावकऱ्यांची केली गळा कापून हत्या

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात काल रात्री नक्षल्यांनी दोन गावकऱ्यांची गळा कापून हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. याआधी २६ जानेवारीलाही याच जिल्ह्यात पोलिसांना खबर दिल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी एका गावकऱ्याला ठार केलं होत. गेल्या वर्षभरात नक्षलवाद्यांनी बस्तर भागातल्या ६८ गावकऱ्यांची हत्या केली आहे .  

December 5, 2024 2:09 PM December 5, 2024 2:09 PM

views 16

अमेरिकेतील आरोग्य वीमा कंपनी युनायटेड हेल्थकेअर चे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन थॉमसन यांची हत्या

अमेरिकेतली सर्वात मोठी आरोग्य वीमा कंपनी युनायटेड हेल्थकेअर चे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन थॉमसन यांची काल न्युयॉर्कमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एका चेहरा झाकलेल्या व्यक्तींन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. थॉमसन यांची कट रचून हत्या करण्यात आल्याचं स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं. सुमारे ८१ अरब डॉलर्सची उलाढाल असलेल्या वीमाकंपनीची सुत्र थॉमसन यांनी २०२१ मध्ये हाती घेतली होती.

June 18, 2024 7:40 PM June 18, 2024 7:40 PM

views 10

वसईमध्ये भर रस्त्यात तरुणीचा हत्या

वसईमध्ये आज भर रस्त्यात एका तरुणानं एका मुलीवर वार करत तिची हत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपीला वालीव पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना दिले असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. सखोल तपास करुन, न्यायालयात भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल, यादृष्टीनं निर्देश दिले असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे म्हटलं आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्य महिला आयोग पाठपुर...