November 13, 2024 12:51 PM November 13, 2024 12:51 PM

views 14

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप अंतर्गत राबवण्यात आले विविध उपक्रम

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासन स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवत आहे. याअंतर्गत काल सांगली शहरात आणि सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर इथं सायकल आणि दुचाकी फेरी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले होते.   धुळे जिल्ह्यात शिरपूर नगरपालिकेनं रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यासह मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती केली. तसंच घरोघरी जाऊन मतदारांना मतदानाचं महत्त्व सांगितलं जात आहे. कोल्हापूरमध्ये विविध शासकीय तसंच निम शासकीय कार्यालयांती...