August 15, 2025 1:45 PM

views 11

एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनाचा देशभरात उत्साह

राजधानी दिल्लीतल्या मुख्य कार्यक्रमासह देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा होत आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, डॉ. एस. जयशंकर, नितीन गडकरी, डॉ. जितेंद्र सिंह, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी शासकीय निवासस्थानी तिरंगा फडकावला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी छत्रसाल स्टेडियम इथं ध्वजवंदन केलं.  गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी, तर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रध्वज फडकावला.  कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगळुरू इथं, तर...