September 28, 2024 7:26 PM September 28, 2024 7:26 PM
7
मुंबई महानगराची स्वच्छता करून लोकांचं आरोग्य निरोगी ठेवण्यात स्वच्छता मित्रांचा मोलाचा वाटा – भूषण गगराणी
मुंबई महानगराची स्वच्छता करून लोकांचं आरोग्य निरोगी ठेवण्यात स्वच्छता मित्रांचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी काढले. स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात आयुक्त गगराणी यांच्यासह इतर अधिकारी सहभाही झाले. यावेळी गगराणी बोलत होेते. आज मुंबईत महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी जनजागृती केली.