October 28, 2024 8:45 PM October 28, 2024 8:45 PM
10
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ यांच्या हस्ते टाटा एअरक्राफ्ट संकुलाचं उद्घाटन
गुजरातमधे वडोदरा इथं C-295 लष्करी विमानांच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या टाटा एअरक्राफ्ट संकुलाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ यांच्या हस्ते आज झालं. टाटा एअरबस प्रकल्प हा मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत लष्करी विमानांसाठीचा भारतातला खाजगी क्षेत्रातला पहिला एरोस्पेस प्रकल्प आहे. भारत आणि स्पेनदरम्यान संरक्षणक्षेत्रातले संबंध या प्रकल्पामुळे अधिक दृढ होतील, त्याचप्रमाणे मेक इन इंडियालाही बळ मिळेल, असं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले. भारत साऱ्या जग...