June 13, 2025 11:09 AM June 13, 2025 11:09 AM

views 6

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महापालिकेसह अ, ब आणि क वर्ग दर्जाच्या महापालिकांना प्रभाग रचना प्रक्रिया ११ जून ते २९ ऑगस्ट २०२५ दरम्यान पूर्ण करायची आहे. राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना २९ ऑगस्ट ते चार सप्टेंबर २०२५ दरम्यान अधिसूचनेद्वारे जाहीर केली जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.