June 14, 2024 2:31 PM June 14, 2024 2:31 PM
21
सिक्किमच्या मुख्यमंत्र्यांनी सोरेंग चाकुंग मतदारसंघाच्या आमदारकीचा दिला राजीनामा
सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी सोरेंग चाकुंग मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन मतदारसंघात विजयी झाल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दोन मतदार संघात विजयी झालेल्या उमेदवाराला निकाल लागल्यापासून १४ दिवसांच्या आत एका मतदारसंघाचा राजीनामा द्यावा लागतो.