July 23, 2024 8:29 PM July 23, 2024 8:29 PM

views 4

सोने, चांदी स्वत होणार; अर्थसंकल्पात कर कपातीची घोषणा

सोने, चांदी आणि प्लॅटिनमवरच्या करांमध्ये अर्थमंत्र्यांनी आज कपातीची घोषणा केली. त्यानुसार सोन्या, चांदीवर ६ टक्के आणि प्लॅटिनमवर ६ पूर्णांक ४ टक्के आयात शुल्क लागेल. मोबाइल, मोबाइलचे चार्जर, कर्करोगावरील आणखी ३ औषधं, एक्स रे मशीनचे साहित्य, विविध धातू, सौर ऊर्जेसाठी लागणारे पॅनल आणि बॅटरी, कोळंबी, मासांचे खाद्य वगैरेंवर कर सवलत आज अर्थमंत्र्यांनी जाहीर केली. त्याचवेळी  फ्लेक्स बॅनर, दूरसंचार उपकरणे, अमोनियम नायट्रेटवरचा कर वाढवला.