February 11, 2025 10:49 AM

views 18

दिव्यांग तिरंदाजी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या सरिताला सुवर्णपदक

बँकॉक इथं सुरू असलेल्या दिव्यांग तिरंदाजी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या सरिता हिने महिलांच्या संयुक्त खुल्या प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. काल दुपारी झालेल्या सामन्यात तिने सिंगापूरच्या खेळाडूवर 143-142 असा विजय मिळवला. तर पुरूषांच्या डब्यू1 प्रकारात भारताच्या आदिल मोहम्मग नाझीरने हाँगकॉगच्या खेळाडूचा पराभव केला.

January 15, 2025 3:42 PM

views 8

आंतरविद्यापीठ नेमबाजी स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाला सुवर्णपदक

चंदीगडच्या पंजाब विद्यापीठात ९ ते १८ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ नेमबाजी स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठानं सुवर्णपदक पटकावलं आहे. ५० मीटर थ्री पोझिशन रायफल नेमबाजीत पुरुष गटात रुद्रांक्ष पाटील याने आपल्या उत्कृष्ट नेमबाजीच्या जोरावर ६०० पैकी ५९३ गुण मिळवत सुवर्णपदक मिळवलं. यापूर्वी रुद्रांक्षने आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. रुद्रांक्षनं गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसर इथल्या ऑलिंपियन नेमबाज ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर याला एका गुणानं मात...

December 3, 2024 2:36 PM

views 13

43व्या कनिष्ठ गट राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्याही संघानं जिंकलं सुवर्णपदक

43व्या कनिष्ठ गट राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्याही संघानं सुवर्णपदक जिंकत आपलं वर्चस्व अबाधित राखलं आहे. मुलांच्या संघानं या स्पर्धेच्या इतिहासातला 35 वा विजय नोंदवत त्यांचा सलग 19 वा विजय साजरा केला, तर मुलींच्या संघानं सलग दहावं आणि एकूण 26 वं विजेतेपद पटकावलं. मुंबईच्या महाराणी अहिल्याबाई होळकर क्रीडा स्टेडियमवर या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत जितेंद्र वसावे आणि सुहानी धोत्रे यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वीर अभिमन्यू आणि जानकी पुरस्काराने सन्मानित करण्...