June 20, 2025 2:08 PM June 20, 2025 2:08 PM

views 19

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. कांकेर जिल्ह्यातल्या अमाटोला आणि कालपर भागातल्या जंगलात ही चकमक झाली. जिल्हा राखीव दल, सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये अजूनही अधूनमधून गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दलांची पथकं परिसराची कसून तपासणी करत आहेत.

November 10, 2024 5:03 PM November 10, 2024 5:03 PM

views 14

जम्मू-काश्मीर : सुरक्षा दलाची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरूच

जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर नजिकच्या झाबरवान जंगल परिसरात आज सकाळी सुरक्षा दलानं केलेल्या शोधमोहिमेनंतर सुरक्षा दलाच्या जवानांची दहशतवाद्यांसोबत सुरु झालेली चकमक अद्यापही सुरुच असल्याचं वृत्त आहे. संशयित स्थळी सुरक्षा दलाचे जवान पोहोचताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करायला सुरुवात केली. या चकमकीत अजूनपर्यंत जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.  

September 30, 2024 7:51 PM September 30, 2024 7:51 PM

views 12

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांची व्यापक शोधमोहीम

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत नुकत्याच झालेल्या चकमकीनंतर आज सुरक्षा दलांनी व्यापक शोधमोहीम राबवली. कठुआ जिल्ह्यातल्या बिल्लवर तालुक्यातल्या कोग मंडली जंगल परिसरात शनिवारी संध्याकाळी पोलीस आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एका पोलिसाला वीरमरण आलं होतं तसंच एक दहशतवादी  ठार झाला होता. तर रजौरी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक झाली होती. या पार्श्वभूमीवर आज सलग तिसऱ्या दिवशी शोधमोहीम राबवण्यात आली. 

July 21, 2024 2:17 PM July 21, 2024 2:17 PM

views 15

मणिपूरमधे सुरक्षा कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रात्र आणि स्फोटकं जप्त

मणिपूरमधे सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रात्र आणि स्फोटकं जप्त करण्यात आली. इंफाळ आणि चुराचांदपूर जिल्ह्यांमधे हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या शोधमोहिमेदरम्यान राज्यात २९६ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु केली आहे. राष्ट्रीय महामार्गांवर बंदोबस्तात वाढ करुन वाहतूक सुरक्षित होईल, याची काळजी घेतली आहे डोंगराळ भागात आण खोऱ्यात मिळून ११६ तपासणी नाके सुरु करण्यात आले आहेत.