February 5, 2025 2:35 PM February 5, 2025 2:35 PM

views 13

टेनिस: सुमित नागलचा रोझारियो चॅलेंजरच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

अर्जेंटिना इथं सुरू असलेल्या रोझारियो चॅलेंजर टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सुमित नागल याचा सामना आज बोलिव्हियाच्या ह्यूगो डेलिएन याच्याशी होणार आहे. सुमितनं याआधीच्या सामन्यात रेंझो ऑलिव्हो याच्याविरुद्ध झालेल्या सामन्यात ५-७, ६-१, ६-० असा विजय मिळवला होता.  

June 16, 2024 3:04 PM June 16, 2024 3:04 PM

views 64

भारतीय टेनिसपटू सुमित नागलचा पेरुगिया चॅलेंजर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

भारतीय टेनिसपटू सुमित नागल याने बनार्बे जपाटा मिरालेस या स्पेनच्या टेनिसपटूला हरवून पेरुगिया चॅलेंजर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीच्या अंतिम फेरीत मात्र भारताचा एन श्रीराम बालाजी आणि जर्मनीच्या आंद्रे बेगेमॅन या जोडीला अर्जेंटिना आणि मेक्सिको यांच्या टेनिसपटू जोडीपुढे हार पत्करावी लागली.

June 15, 2024 11:45 AM June 15, 2024 11:45 AM

views 21

एटीपी चॅलेंजर स्पर्धेत सुमित नागलचा पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश

भारतीय टेनिसपटू सुमित नागलने इटलीतल्या पेरुगिया इथं सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत सुमितनं पोलंडच्या मॅक्स कास्निकोव्स्कीचा ६-४, ७-५ असा पराभव केला. सहाव्या मानांकित सुमित नागलनं उत्कृष्ठ खेळी करत १० दिवसांत सलग आठवा सामना जिंकला आहे. आज उपांत्य फेरीत त्याची लढत स्पेनच्या बर्नाबे जपाता मिरालेसशी होणार आहे. फ्रेंच ओपन आणि हेल्ब्रॉन चॅलेंजरमधल्या सुरेख कामगिरीनंतर नागलनं जागतिक क्रमवारीत ७७व्या स्थानावर झेप घेतली ...