July 16, 2024 9:32 AM July 16, 2024 9:32 AM
6
कॅम्लिन उद्योग समूहाचे संस्थापक,माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे निधन
कॅम्लिन उद्योग समूहाचे संस्थापक,माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचं काल मुंबईत निधन झालं,ते ८५ वर्षांचे होते. शालेय विद्यार्थ्यांना लागणारी गणितीय उपकरणं, पेन्सिल, मार्कर, शाई यांसह चित्रकार आणि अन्य कलाकारांना लागणारं सर्व प्रकारचं साहित्य, कार्यालयीन उत्पादनं आणि व्यावसायिक उत्पादनांची निर्मिती कॅम्लिन या कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या कंपनीची गेली अनेक वर्षे धुरा वाहताना दांडेकर यांनी उत्पादनांची गुणवत्ता आणि मूल्यांशी कधीच तडजोड केली नाही. कला आणि उद्योग क्षेत्रातील अनेकां...